वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज अँड रिसर्च

0

नाशिक  : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन संस्थेच्या अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. संजय नेरकर, (संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई) आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ .नरेंद्र तेलरांधे, प्रभारी प्राचार्या डॉ. सरीता वर्मा, अभ्यासक्रम समन्वयीका डॉ. प्रिती सोनार, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. आशा ठोके, विद्यार्थिनी प्रतिनिधी एस्थर यांच्या हस्ते झाले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. सरीता वर्मा यांनी वार्षिक घडामोडींचा आढावा सादर केला.
डॉ. नेरकर यांनी शिक्षक हे राष्ट्रनिर्माते आणि तरुण मनाचे विकासक आहेत. त्यासाठी आयुष्यात विविध छंद जोपासण्याचा मोलाचा संदेश दिला. डॉ. तेलरांधे यांनी येणाऱ्या चढाओढीच्या युगातही अशोका कॉलेजचा शंभर टक्के  प्लेसमेंट आणि युनिव्हर्सिटी टॉपरचा वारसा पुढेही असा चालत राहावा, यासाठी विद्यार्थिनींनी सतत प्रयत्नशील राहावे, यासाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. एस्थर, समीक्षा, रूपाली, गजाला, सालेहा, अंजली, सदाफ आणि श्रद्धा या एफ.वाय.बी.एडच्या विद्यार्थ्यांनींनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. समृद्धी चेपे यांनी केले. प्रा. सविता शिंदे, प्रा. नरेश सावंत, डॉ. आशिष गुरव, डॉ. मोनाली काकडे, प्रा.भारती मलिक, स्वप्नाली कासार, गणेश पारवे, नम्रता जोशी व सर्व सहाय्यक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.