निर्भय कन्या अभियानात मुलींना विकासाचा कानमंत्र

0

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी सेवा समिती, नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, वडाळा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान कार्यशाळा झाली. यावेळी राष्ट्रपिता म. गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन के. एस. के. डब्लू महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी केले. प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून म्हटले की, मुलीनी प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासपूर्वक सामोरे गेले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे ध्येय गाठले पाहिजे.
डॉ. प्रतिमा वाघ यांनी, विद्यार्थिनींनी स्वतःच्या अनुभवातून  परिस्थितीवर मात करत आपण कसे पुढे गेलो पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करून यशस्वी व्हा आणि सगळ्यांचा सन्मान ठेवून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तसेच जीवनात कोणत्याही आमिषला बळी पडू नका. आपला देश, समाज यासाठी तुम्हीच आधार आहात. शिक्षणासाठी पैसा लागत नाही तर त्यासाठी परिश्रम,जिद्द व चिकाटी लागते असे त्यांनी सांगितले.
आहारतज्ज्ञ डॉ. वंदना खैरनार यांनी विद्यार्थिनींना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. प्रशिक्षक निलेश गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलींना कराटेविषयक मार्गदर्शन केले. इतिहास विभागप्रमुख प्रा. सोमनाथ विघे यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा विभागप्रमुख प्रा. दीक्षा जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संदीप देवरे यांनी केले होते. याप्रसंगी प्रा. सादिक पिरजादा, प्रा. मीरा शिंदे, प्रा. हीना शेख, प्रा. तय्यब शेख, प्रा. दिव्या साळुंके, प्रीतम देवरे, अशोक बागूल, हमजा शेख, तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.