अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे २००३–२००४ या शैक्षणिक वर्षातील विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेले कमांडर विपिन चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आपल्या माजी विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजवंदन होणे ही विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली. विद्यालयाचे विश्वस्त निवृत्त कर्नल विजयकुमार दत्ता, विद्यालयाच्या संस्थापिका सुमन दत्ता उपस्थित होते.
झेंडा गीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर कावेरी मुळाणे, ईशान हरसूले व आद्या काळे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. पुढे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘जयस्तुते जयस्तुते श्री महान मंगले’, ‘वतन की राह पे वतन के नौजवान’, ‘रंग दे बसंती’, ‘कंधो से मिलते हैं कंधे’ अशा देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण शालेय परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला.
—