सेंट लॉरेन्सच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत दमदार कामगिरी

0

नाशिक : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची आणि अथक परिश्रमांची पुन्हा एकदा प्रभावी छाप उमटवत महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (एमटीएसई) यामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दरवर्षी आयोजित केली जाणारी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या विविध विषयांतील ज्ञान, आकलनशक्ती, तर्कशक्ती व बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणारी आव्हानात्मक परीक्षा म्हणून ओळखली जाते.                                           या परीक्षेत इयत्ता नववीतील शिवम भामरे तसेच इयत्ता दहावीतील अक्षा ह्याळीज, देवांश पाटील आणि देवांग बोरसे यांनी उज्ज्वल यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक अधिक वृद्धिंगत केला.
कठीण आव्हानांसमोर न डगमगता सातत्यपूर्ण प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

“यशाला शॉर्टकट नसतो; जिद्द, मेहनत आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग!” या उक्तीला सार्थ ठरवत लॉरेन्शियन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाची पताका उंचावली आहे.

शाळेच्या व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी, शिक्षकवृंदाने व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.