नाशिक : प्रतिनिधी
विद्या सेवा संस्था, नाशिकच्या प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात झाला.
विद्या सेवा संस्थेचे संस्थापक सचिव तथा मुख्याध्यापक गणेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणित स्पोर्ट्स रायफल शूटिंगचे प्रशिक्षक व योगशिक्षक प्रशांत नागरे यांच्या सूत्रसंचालनाने योग दिन प्रोटोकॉलनुसार साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रार्थना, योगगीत, श्लोक, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार घेण्यात आले.
—