बिटको महाविद्यालयात संविधानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन

0

नाशिक  : प्रतिनिधी
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स, एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक रोड येथील ग्रंथालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित भित्तिपत्रके तयार केली होती. तसेच ग्रंथालयात संविधान विषयक पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले.
सर्व मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल चंद्रात्रे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे होते. यावेळी त्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, संविधान हे प्रत्येक भारतीयाच्या जगण्याचा आधार आहे. आपले हक्क माहित असणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच कर्तव्य पार पाडणेही महत्त्वाचे आहे. संविधानाची प्रत प्रत्येक घरात असली पाहिजे व प्रत्येक नागरिकाने त्याचे वाचन व अभ्यास करावा.

यावेळी प्रा. डॉ. गाडेकर, प्रा. डॉ. करमाळकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. संविधानातील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.