पेठरोडवर हनुमान चौक परिसरात साईराम क्लिनिकतर्फे मोफत आरोग्य शिबीरात 350 जणांची तपासणी

0
नाशिक  : प्रतिनिधी
पंचवटीतील पेठरोडवरील नमन गार्डन, हनुमान चौक परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर झाले. या शिबिरामध्ये दिंडोरी रोड, पेठ रोड भागातील  जवळपास ३०० ते ३५० रुग्णांनी तपासण्या करून घेतल्या. साईराम क्लिनिकतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सचिन देवरे व डॉ. प्रतीक्षा देवरे – पिंगळे यांनी वैद्यकीय तपासण्या केल्या.

सकाळी १० ते दुपारी तीनवाजेपर्यंत हे मोफत  शिबीर होते. या शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा, ईसीजी,  हृदयरोग, मधुमेह, त्वचारोग, नेत्र, गुडघे व मणके विकार, बालरोग, स्त्रीरोग तपासणी करण्यातआली. लहान मुलांना सुवर्णप्राशनचा डोस मोफत देण्यात आला. शिबिरात लाभ घेतलेल्या जेष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त  करून आभार मानले.

लवकर निदानाने प्रभावी उपचार
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी वेळ मिळणे अवघड झाले आहे. कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास तो लवकरात लवकर बरा व्हावा, हे शिबिर घेण्यात आले.
– डाॅ. सचिन देवरे

मोफत शिबीर नेहमी घेतो
या परिसरामध्ये असे विविध प्रकारचे मोफत आरोग्य शिबिर आम्ही दर सहा महिन्याला राबवत असतात. अशा शिबिराचा सर्व गरीब रुग्ण नेहमीच लाभ घेत असतात.
– डॉ. प्रतीक्षा देवरे – पिंगळे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.