नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील हिरावाडी (प्रभाग क्रमांक – ३) परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आज एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले. पंचवटी फिल्टरेशन प्लांट ते शक्तीनगर जलकुंभ दरम्यानची २५ वर्षे जुनी जलवाहिनी बदलून, आता ६०० मी.मी. व्यासाची नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात झाले.
प्रभाग क्रमांक- ३ मधील हिरावाडी येथील गणेश देवतेचा आशीर्वाद घेऊन महापौर हिमगौरी आहेर – आडके, आयुक्त मनीषा खत्री, प्रभाग क्रमांक – ३ चे नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेविका प्रियंका धनंजय माने व जुई शिंदे, नगरसेवक गौरव गोवर्धने, भाजपचे महानगर उपाध्यक्ष धनंजय (पप्पू) माने, पाणीपुरवठा विभाग अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, नरेंद्र शिंदे, दत्तात्रय बागूल व प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित.

हिरावाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केले. त्याबद्दल प्रभागतीली नागरिकांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे.
—
—