नाशिक : प्रतिनिधी
जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातंर्गत जनजाती गौरव सप्ताहनिमित्त शिवचरित्रकार, आदिवासी अभ्यासक, व्याख्याते भाऊसाहेब नेहरे व रेखा भाऊसाहेब नेहरे यांचा जाहीर सत्कार व मुलाखत घेण्यात आली. वीरंगणा दयावती कंवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिंडोरी यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांची आदिवासी समाजातील विविध पैलूबद्दल मुलाखत घेण्यात आली. वीरंगणा दयावती कंवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिंडोरीचे प्राचार्य सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाने जगदीश जाधव, किशोर ठाकूर, कपूरचंद पाटील, मधुकर गायकवाड, संदीप तुपे, कल्याणी भागवत, अश्विनी वराडे या सर्वांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जगदीश जाधव यांनी शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांची मुलाखत घेत असताना अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालत आपण नेहमी आपल्या व्याख्यानातून जय शिवराय, जय भिमराय, जय आदिवासी हा नारा देऊन सर्वधर्मसमभाव ही प्रचिती देत असतात. तसेच आदिवासी थोर अभ्यासक दिवंगत निसर्गवाशी गोविंद गारे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने आदिवासी समाजात प्रबोधने व आदिवासी साहित्य, आदिवासी महानायकांचा इतिहास समाजापर्यंत जर कोणी पोहचवत असेल तर ते आपणच आहात. आपण लिहिलेले सह्याद्रीचा वाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या पुस्तकाचे नोंद ही मराठी विश्वकोशाने घेतलेली आहे. त्यामुळे हा निश्चितच आपला एक महत्त्वपूर्ण सन्मान आहे. समाजातील तरुणांसाठी व समाजाला आपण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून कायमस्वरूपी आदर्श आहात.
तसेच आपण दत्तक घेतलेल्या समाजातील असंख्य मुलांनी त्यांचे भविष्य निर्माण केले आहे. आपण हे कार्य अविरतपणे सुरू ठेवलेले आहे, अशा अनेक प्रश्न मुलाखतीच्या वेळी मुलाखतकर्ते जगदीश जाधव यांनी घेतली.
याप्रसंगी शिवचरित्रकार, व्याख्याते, आदिवासी अभ्यासक भाऊसाहेब नेहरे लिखित सह्याद्रीचा वाघ क्रांतिकारक राघोजी भांगरे जीवनचरित्र उपस्थितांना भेट देण्यात आले.
—