नाशिक : प्रतिनिधी
डॉ. राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे या बंधूंनी लिहिलेल्या आंतरराष्ट्रीय विकासाचे अर्थशास्त्र, तसेच त्यांनी लिहिलेली इतर क्रमिक पुस्तके ही अत्यंत दर्जेदार असून त्याने विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
डॉ. राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या आंतरराष्ट्रीय विकासाचे अर्थशास्त्र या सर साहित्य केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावरील तृतीय वर्ष कला या वर्गासाठी असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार उदयनराजे भोसले यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. शहाणे बंधूंनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्राची पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या 17 व्या पुस्तकाचे प्रकाशन जलमंदिर पॅलेस, सातारा येथे नुकतेच झाले. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉ. शहाणे बंधूंचे अभिनंदन केले व त्यांनी यापुढे देखील दर्जेदार लिखाण करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. शहाणे बंधूंच्या लिखाणाचा विद्यार्थी, अभ्यासू, जिज्ञासू यांना निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
—
डॉ. शहाणे बंधूंचे लिखाण विद्यार्थ्यांना उपयुक्त : खासदार उदयनराजे भोसले
Get real time updates directly on you device, subscribe now.