रोटरी क्लब नाशिक मिडटाऊन तर्फे व्यसनमुक्ती निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

0

नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन, अनुसया शिक्षक प्रसारक मंडळ संचलित स्वामीनारायण नर्सिंग संस्था आणि मानस व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने म. गांधी जयंतीनिमित्त आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहा अंतर्गत स्वामीनारायण नर्सिंग विद्यालय, पंचवटी येथे व्यसनमुक्ती विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्वामीनारायण नर्सिंग विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, विशेष अतिथी म्हणून उपप्रांतपाल रो. पराग पातोडकर व उपप्रांतपाल रो. किरण नेवे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे अध्यक्ष रो. दिपक धोळकिया हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी क्लबचे सचिव रो. राजेंद्र वर्मा, सहसचिव रो. नलीन राजपूत, रो. अवतारसिंग पनफैर, रो. विनोद तन्ना, रो. शिरीष भालेराव, रो. मनोज काबरा, रो. चारुलता धोळकिया, कार्यक्रमाचे संयोजक रो. डॉ. नामपूरकर, प्राचार्या चाटसे, मानस व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अमोल पुरी, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रकल्प संयोजक रो. डॉ. नामपूरकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. डॉ. अमोल पुरी यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे व्यसनमुक्ती सप्ताहात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर प्रभावी पथनाट्य सादर केले.  निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष रो दिपक धोळकिया यांनी मार्गदर्शन केले.
प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले, “व्यसन हे आनंदाचे साधन नसून सर्वनाशाचे कारण आहे, हे तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कोणतेही व्यसन हे आरोग्य, पैसा आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टी हिरावून घेते.” सध्याच्या काळात युवावर्गात वाढत असलेले मोबाईलचे व्यसन आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचे सांगून, बालरोगतज्ञ या नात्याने त्यांनी सात वर्षांपर्यंतच्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आवाहन पालकांना केले. विद्यार्थ्यांनी निबंधातून मांडलेले विचार केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणावेत असे आवाहनही त्यांनी केले. शेवटी _”व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा”_ असा संदेश देत, नर्सिंग क्षेत्रात काम करताना स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांनाही व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करणे हाच या सप्ताहाचा खरा संकल्प असेल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव रोटे. राजेंद्र वर्मा यांनी केले.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.