अनुराधा पवार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

0

नाशिक : प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर येथील शिक्षिका अनुराधा मंगलदास पवार यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवारी (दि. २७ सप्टेंबर) नाशिक येथे गुरुदक्षिणा हॉल येथे सकाळी दहा वाजता सदर पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
त्यांनी आजतागायत केलेल्या शैक्षणिक, तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.