आरएमजे वेल्थच्या नव्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ

0

नाशिक : प्रतिनिधी
भाभानगर येथील लेनकर मॅजेस्टिक
येथे आरएमजे वेल्थच्या नव्या कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी (दि. ५ सप्टेंबर २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक केबलचे संस्थापक जिजाऊ सोनवणे होते. तसेच दुर्गराज ॲडव्हेंचर्सचे संस्थापक व संचालक केशव उगले (सर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला एनआरजी – केअर हेल्थ इन्शुरन्स लि., पुणेचे असोसिएट रिजनल बिझनेस हेड – एजन्सी संजय भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आरएमजे वेल्थच्या संस्थापिका रुपाली जाधव, त्यांच्या सासूबाई सरस्वती जाधव, तसेच महेश जाधव यांची उपस्थिती होती.
आरएमजे वेल्थच्या माध्यमातून ग्राहकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक व विमा क्षेत्रात योग्य आणि विश्वासार्ह मार्गदर्शन देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून ग्राहकांशी असलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ करत, त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांना योग्य दिशा देण्यावर भर देण्यात येणार आहे.

“जुने विश्वास, नवी ऊर्जा आणि अधिक व्यापक दृष्टिकोन” या भावनेतून आरएमजे वेल्थने आपल्या नव्या कार्यालयासह पुढील वाटचालीस सुरुवात केली आहे.

या प्रसंगी मित्रपरिवार, ग्राहक, हितचिंतक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आरएमजे वेल्थच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.