नाशिक : प्रतिनिधी
जागतिक भटके विमुक्त दिनानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, सहाय्यक संचालक संतोष चव्हाण, सुदर्शन चव्हाण, महाज्योतीच्या प्रतिभा पगार, मुकुंद यदमल, डॉ. सुभाष भोसले उपस्थित होते. याप्रसंगी भटके विमुक्त जमातीतील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यासह भटक्या विमुक्त जमातीच्या आश्रम शाळांमधील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यकर्त्यांचा सत्कार
मांगूलाल जाधव, रतन सांगळे, मंगलसिंग राजपूत, ज्ञानेश्वर गायकवाड, अशोक बैरागी, सचिन लाटे, संजय सोनवणे, गणेश कुणगर, राजू चव्हाण, सोनल शिंदे, अंजना जाधव, सोनीताई सोनसाळे, गायत्री कदम, योगिता अमृतकर, शालुताई माने.
या शिक्षकांचा सत्कार
तुषार पाटील, रामदास आहेर, रफिक शेख, भाऊसाहेब देवरे, रेणुका गीते, शंकर शिंदे, नंदकिशोर पाटील, मोहनदास गवळी, अमित चव्हाण, वंदना आहेर, पुष्पावती पाटील, सुनील जाधव, भूषण बोरसे.
—