औद्योगिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी अधिक व्यापक : प्राचार्य नितीन काळे

0

नाशिक : प्रतिनिधी
शरणपूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नूतन प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, आत्मविश्वास, आणि उज्वल भवितव्याची स्वप्ने दिसून येत होती.
आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे, गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, गटनिदेशक उमेश पालवे यांच्या हस्ते क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटनिदेशक हेंबाडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयमध्ये शिस्त, नियम, प्रशिक्षणाची पद्धत तसेच संस्थेतील शैक्षणिक वातावरण याबाबत मार्गदर्शन केले. आयटीआयमध्ये केवळ ट्रेडचे प्रशिक्षण घेतले जात नाही तर शिस्त, वेळेचे भान, कामातील अचूकता व जबाबदारीची जाणीव यांसारखे गुणही आत्मसात केले जातात असे त्यांनी स्पष्ट केले
प्राचार्य काळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयचे महत्व उपलब्ध व्यावसायिक अभ्यासक्रम व रोजगाराच्या विविध संधी याबाबत मार्गदर्शन केले. पारंपारिक शिक्षणाबरोबरच आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य आधारित व व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले
यानंतर गटनिदेशक पालवे यांनी आयटीआयमधील विविध ट्रेडची माहिती देत प्रत्येक ट्रेड मधील कौशल्याचे महत्व आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजच्या काळात प्रमाणपत्रापेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व आहे, हातात कौशल्य असेल तर रोजगाराच्या संधीची दारी निश्चित खुले होतात असा संदेश पालवे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिला.
निदेशक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, संदीप काजळे, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, योगेश गांगोडे, मोहन पवार, सुशील लोहकरे, जयेश शिंत्रे, अमोल नागरे आणि सोनाली खिराडी आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.