मुख्याध्यापक उमेश सदाशिव आटवणे (सर) यांचा रविवारी (दि.28) भव्य नागरी सत्कार समारंभ

0

नाशिक : प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उमेश सदाशिव आटवणे (सर) यांची श्रीराम विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
विरशैव लिंगायत गवळी समाज, नाशिक तसेच गोगाबाबा नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ रविवारी (दि. 28 जून) सायंकाळी 6:30 वाजता अभिषेक प्लाझा, साईबाबा मंदिरासमोर, गजपंथ हाऊसिंग सोसायटी, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
आटवणे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.