नाशिक : प्रतिनिधी
भाजपच्या पंचवटी मंडलातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि.२३) कार्यक्रम झाला. ज्येष्ठ्य नेते उत्तमराव उगले यांनी डॉ. मुखर्जी यांच्या कार्याची माहिती दिली. नगरसेविका चित्रा तांदळे, नगरसेवक वाळू काकड, डॉ. जगन्नाथ तांदळे यांनी प्रतिमापूजन केले. राहुल पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन अजित ताडगे यांनी केले होते. रोहिणी दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. मंडल अध्यक्ष बबनराव ढगे यांनी आभार मानले. याप्रसंगी विजय राख, मंडल सरचिटणीस प्रभाकर येवले, नरेश उगले, विजय देवरगावकर, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता सोनवणे, मंडल उपाध्यक्षा गीता वाघमारे आदी उपस्थित होते.

मोफत नेत्रतपासणी शिबीर व चष्मा वाटप कार्यक्रम
तसेच पंचवटी मंडल व दुर्गा आय हॉस्पिटल (विठ्ठलनगर, पवार मळा, मखमलाबाद) यांच्यातर्फे डॉ. मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर व चष्मा वाटप कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ्य नेते उत्तमराव उगले, नगरसेविका चित्रा तांदळे, नगरसेवक वाळू काकड, डॉ. जगन्नाथ तांदळे, पंचवटी मंडल अध्यक्ष बबनराव ढगे, अजित ताडगे, राहुल पवार, रोहिणी दळवी, अनिता सोनवणे, गीता वाघमारे, विजय देवरगावकर, मंगेश पवार आदी उपस्थित होते. ढगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मुखर्जी यांच्या कार्याची माहिती उत्तमराव उगले यांनी दिली.
—