आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एआयसीइएसआर महाविद्यालयात योग साधनेचा उत्साह

0

नाशिक  : प्रतिनिधी
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, ‘अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज अँड रिसर्च’ (एआयसीइएसआर) आणि ‘अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन’ (एसीइ) यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
चुकीच्या सवयी, मानसिक ताणतणाव, आधुनिक आजार ,भविष्याची चिंता यामुळे ‘स्ट्रेस’ आणि ‘अँक्झायटी’ चे प्रमाण वाढले आहे. माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे कोलमडून गेले आहे. या पार्श्वभूमीवर, योगाभ्यास हा केवळ एक व्यायाम प्रकार न राहता, निरोगी राहण्यासाठी एक उत्तम ‘जीवनमार्ग’ ठरतो आहे. प्राणायाम आणि ध्यानाचे महत्त्व पटवून देत प्रसिद्ध योगतज्ज्ञ प्रिती चांदोरकर यांनी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी पवनमुक्तासन, मर्कटासन, पर्वतासन यासारख्या विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव करत शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल साधण्याचा संकल्प केला.
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला तसेच प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे व यांनी जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना उज्ज्वल व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

योग शिबिरात एआयसीइएसआरच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. आशा ठोके, तसेच दोन्ही महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी डॉ. मोनाली काकडे व कविता पालवे यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.