नाशिक : प्रतिनिधी
हरी ओम योग केंद्र, मेरी -म्हसरूळ चा आठवा वर्धापनदिन उत्साहात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) अंतर्गत योग महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निलेश वाघ उपस्थित होते. भगवान परशुराम हॉल, राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, तारवाला नगर, दिंडोरीरोड येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी योगाचार्य रमेश धस, निसर्गोपचार प्रमुख प्रतिभा धस, हरी ओम योग केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.
डाॅ. वाघ यांनी, समाजात योगाच्या नावाने सुरू असलेल्या व्यावसायिकरणाचे दुष्परिणाम आहे. यामुळे पारंपरिक योग मागे पडत असल्याची खंत व्यक्त केली. व कार्यवाढीसाठी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या. योग विद्या गुरुकुल अंतर्गत पारंपरिक योग शिकविला जात असून सामाजिक हित लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त यावर भर द्यावा असेही डाॅ. वाघ यांनी सुचविले.

रमेश धस यांनी जागतिक योग दिनानिमित्त सुरु असलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली व जास्तीत जास्त ठिकाणी योगदिन साजरा करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.योग शिक्षकांनी कार्यवाढीसाठी मनोगत व्यक्त केले. योगाचार्य प्रतिभा धस व दिलीपकुमार औटी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. निकम यांनी योग प्रचार कार्यात सर्वांना योगदान देण्यासाठी आवाहन केले. यावेळी योग गीत सादर करण्यात आले.
—