युडब्ल्यूसीईसीत मुलांसाठी प्राण्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

0

नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये बालवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्राण्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अशा उपक्रमांमुळे वर्गातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्यास मदत होते आणि लहान मुलांची जिज्ञासा वाढीस लागते.

या प्रदर्शनात नर्सरी व ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक विद्यार्थ्याला एका प्राण्याची प्रतिकृती देण्यात आली होती. त्याबाबत मुलांनी पालकांसमोर माहिती दिली. शिक्षकांनी विविध प्राण्यांचे आकर्षक थ्रीडी मॉडेल तयार करून वर्गाला जंगल व शेताचा देखावा दिला होता. ज्यामुळे संपूर्ण वातावरण अधिक जिवंत व आनंददायी झाले होते. लहानग्यांनी आत्मविश्वासाने आपापल्या प्राण्यांबद्दल माहिती सादर केली. आपल्या मुलांचे सादरीकरण पाहून पालकांनीही आनंद व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.