नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कथा माध्यमातून जीवनमूल्ये समजावून देण्यावर विशेष भर दिला जातो.
“कथा या महत्त्वाच्या जीवनधड्यांना शिकवण्याचा प्रभावी मार्ग आहेत,” या उक्तीप्रमाणे शाळेत ‘कथालय’ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची वाचन कौशल्ये विकसित करणे, आत्मविश्वास वाढवणे, तसेच कथांद्वारे नैतिक मूल्यांची जाणीव करून देणे हा होता. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ड्रिगेटी ड्रॉप द डिटरमाइंड ड्रॅगन’ आणि ‘तेनाली रामन यांसारख्या रंजक कथा वाचल्या.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ कथा वाचून थांबले नाहीत, तर बाहुल्यांच्या सहाय्याने त्या कथा पुन्हा सांगितल्या आणि पात्रांचे सादरीकरणही केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली तसेच कल्पनाशक्ती वाढण्यास मदत झाली. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक कथेमागील संदेश आणि मूल्ये अधिक चांगल्या प्रकारे समजली, ज्यामुळे शिक्षण अधिक आनंददायी आणि अर्थपूर्ण ठरले.
—
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘कथालय’ उपक्रमातून जीवनमूल्यांचे शिक्षण
Get real time updates directly on you device, subscribe now.