नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
पारितोषिकांचे पाच प्रमुख गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक शिस्तबद्ध वर्ग, विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक सहभाग नोंदविणारा वर्ग, इंग्रजी भाषेत सर्वाधिक संवाद साधणारा वर्ग, लक्षणीय प्रगती दर्शविणारा वर्ग आणि सर्वोत्तम वर्ग यांचा समावेश होता.
या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीस लागली. तसेच त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अभिमानाची व प्रेरणेची भावना निर्माण झाली. या सन्मानामुळे केवळ वैयक्तिक यशाचा गौरव झाला नाही, तर एकात्मता आणि सामूहिक प्रगतीची जाणीवही दृढ झाली.
—