अशोकामध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना विभाग यांच्या वतीने  ‘कारवा’ हा माजी विद्यार्थी मेळावा – २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांशी पुन्हा जोडले जावे तसेच त्यांचे व्यावसायिक अनुभव जाणून घेणे आणि महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देणे हा या मेळावाचा उद्देश होता. यासाठी महाविद्यालयातर्फे अशोका मोह फार्म येथे विद्यार्थ्यांसाठी प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा निकिता कुकरेजा आणि रितेशा मालपाणी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. महाविद्यालयातील वेगवेगळ्या शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना जाणून घेण्याच्या उद्देशाने संगीत खुर्ची आणि मजेशीर खेळ आदी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यांमध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवला आणि एकमेकांशी संवाद साधला.
संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या त्यांनी विद्यार्थांना महाविद्यालयाप्रती माजी विद्यार्थी संघटनेची भूमिका आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या भविष्यातील योजना याविषयी माहिती दिली.
यावेळी व्यावसायिक जीवनातील प्रगतीबद्दल ललित पाटील, शिवम चौहान, मानसी राऊत, समीर पायमोडे, पूर्वा दिवटे, निशांत जाधव, जय पटवा, विरेन पंजवाणी, रितेशा मालपाणी, मोनिका तिवारी, वरद गायधनी, ओमप्रकाश बोडके आणि अमृता होटसिंघानी या माजी विद्यार्थ्यांना स्टार एल्युमिनाय म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना समन्वयक कोमल कदम, प्रिया बुधलानी, सेजल मालपाणी आणि संघटनेच्या अध्यक्षा निकिता कुकरेजा, तसेच रितेशा मालपाणी यांनी प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील, बीबीए शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बीबीए-सीए शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे बीएस्सी-सीएस शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे आणि बी.कॉम विभाग शाखा प्रमुख डॉ. परमेश्वर बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.