नाशिक : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन संस्थेच्या अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी श्रीपाद बुरकुले, सहाय्यक कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्र नाशिक आणि संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयात झालेल्या विविध अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून केले. अहवाल वाचनात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जात आहे हे सांगितले. अतिथी भाषणात श्रीपाद बुरकुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थांनी आपल्या शिक्षकांकडून जेवढे ज्ञान अवगत करता येईल तेवढे करून घ्यावे. कारण त्याचा उपयोग विद्यार्थांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल.

संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पालकांचे कौतुक केले. मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे कि, मी भावी शिक्षकांचा सन्मान करत आहे असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या संकल्प या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व संपादकीय सदस्यांचे प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयातील बी.ए. बी.एड. मधुन सर्वोत्तम गुण मिळवत प्रथम आल्यामुळे अर्चना पंत हिचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बी.एस्सी.बी.एड मधील मदिहा शेख आणि प्रियाकुमारी शर्मा यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शितल जाधव हिने एन.एन.एस.च्या प्रादेशिक संचालनालय, पुणे यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे राष्ट्रीय एकात्मता शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण केले, भावेश बाविस्कर याने आव्हान – आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे निवड झाल्याबद्दल, फातेमा रामपूरवाला हिने विद्यापीठ स्तरीय अविष्कार कार्यशाळा पूर्ण केली त्याबद्दल, नफिसा सैफी हिने शोध मंथन पुणे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रदर्शनात शोधनिबंध सादर केला व तिच्या शोधनिबंधाला तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच विनोना चार्ल्स हिने आंतरविभागीय महिला पावरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. याबद्दल सर्व विद्यार्थांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयातर्फे या वर्षी विद्यार्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विविध स्पर्धेत सहभाग घेऊन आणि सर्वाधिक विजेते पद मिळवल्याबद्दल ललिता पालीवाल हिला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रिडादिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आणि सर्वाधिक विजेते पद मिळवल्याबद्दल जगदीश गावित आणि राहीन पठाण यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सहा. प्रा. कविता पालवे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नैरीन पठाण व आभार प्रदर्शन रफत शेख यांनी केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक प्रा. प्रिया कापडणे, बी.ए.बी.एड.च्या समन्वयक सहा. प्रा. स्मिता बोराडे व बी.एस.सी.बी.एड.च्या समन्वयक डॉ. रेखा पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
—