लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळातर्फे योगसाधनेतून गुरुदक्षिणा उपक्रम

0

नाशिक  : प्रतिनिधी
मला तुमच्या योगसाधनेच्या प्रात्यक्षिकातून खरी गुरुदक्षिणा मिळाली आहे. ही साधना जीवनभर सुरू ठेवा आणि आपल्या भारत मातेचे आदर्श नागरिक बना, असे आवाहन योगगुरू डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी केले. लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळातर्फे आयोजित योगसाधनेतून गुरुदक्षिणा या कार्यक्रमात डाॅ. मंडलिक बोलत होते. पौर्णिमाताई मंडलिक, संस्थेचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी, उपाध्यक्ष उदय शेवतेकर, कार्यवाह सुधीर पाटील, अनिल कुरविंनकोप, राजेंद्र सराफ, सतीश खोंड, सुषमा भानगावकर, श्रीराम महाजन, प्रवीण देशपांडे, प्रमोद सहारे, नवनाथ बोडके उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनो, सदाचारी बना, योग साधनेच्या सातत्याने तन-मन पवित्र होते. यातून दृष्ट शक्ती आपल्यापासून दूर होतात, असे विचार पौर्णिमाताई मंडलिक यांनी मांडले. शेवतेकर यांनी उपक्रमांची माहिती दिली. सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयश्री पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शर्मिला डोंगरे यांनी प्रात्यक्षिक मार्गदर्शिका म्हणून काम पाहिले. अर्पिता घारपुरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पुरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्वाना भारत मातेचे छायाचित्र भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या लोकमान्य विद्यालय (नाशिक), आठवले – जोशी बालविकास मंदिर (मेरी), लोकमान्य विद्यालय (भयाळे) या शाळेतील १३४ विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.