श्री नवनाथ ग्रंथ पारायण व कथा निरूपण सप्ताहाचे आयोजन

0

नाशिक  : प्रतिनिधी
श्री नवनाथ ग्रंथ पारायण व कथा निरूपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पाच फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री श्रीमंत गणेश मंदिर, शिवसमर्थनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, ओमकार बंगला, आरटीओ ऑफिसजवळ, पेठरोड, नाशिक येथे होत आहे.    
सामुदायिक पारायण सकाळी आठ ते १० व कथा निरूपण सायंकाळी चार ते सात वाजेदरम्यान होत आहे.
विद्या सेवा संस्थेचे सचिव तथा प्रणित प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पिंगळे यांनी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन केले आहे. या सप्ताहात नाथसंप्रदायाचे संशोधक आणि श्री कानिफनाथ महात्मे या ग्रंथाचे लेखक ह.भ.प. मिलिंद सदाशिव चवंडके महाराज नवनाथांच्या महतीचे निरूपण करत आहेत. भाविकांनी या अमृतमय कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.