नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, १०० मीटर धावणे, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, रस्सीखेच, रिले, सॅक रेस, थ्री लेग रेस यासारख्या वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धा प्रकाराचा समावेश होता. महाविद्यालयातील बीए – बी. एड. आणि बीएस्सी – बी. एड. शाखेतील विद्यार्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उदघाटन पॅरास्विमिंग राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त गौरी गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपला खेळाडू बनण्याचा प्रवासाबद्दल विद्यार्थांना सांगितले. त्या म्हणाल्या की, खेळाकडे सकारात्मक दृष्टीने बघावे आणि खेळामध्ये देखील करिअर होऊ शकते, त्यासाठी विद्यार्थांनी खेळाला महत्त्व दिले पाहीजे.
संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनीही म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खेळातील उपलब्ध असलेल्या संधीचे यशामध्ये रूपांतर करावे.
मृणाल मानकर आणि नैरीन पठाण या विद्यार्थांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालय प्रतिनिधी अदिती सिंग, क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी मोहित पाटील यांनी क्रीडा शपथ दिली.
दुपारच्या सत्रात बक्षीस वितरण झाले. ध्वनी छाबिया आणि समृद्धी चिमोटे यांनी सूत्रसंचालन केले. ललिता पालीवाल हिने आभार मानले. क्रीडामहोत्सव समन्वयक म्हणून शारीरिक क्रीडा संचालक डॉ. सुदर्शन नागरे व अक्षय आव्हाड यांनी काम बघितले.
स्पर्धा यशस्वी होण्याकरीता महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके, बी.ए. – बी एड. समन्वयक डॉ. स्मिता बोराडे आणि बी. एस्सी.- बी. एड. समन्वयक डॉ. रेखा पाटील, आय. क्यू. ऐ. सी. च्या समन्वयक प्रिया कापडणे आणि महाविदयालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर यांनी सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला यांनी स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या आणि सहभाग नोंदवण्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
—
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.