माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांची 10 पासून प्रवचनमाला

0

नाशिक : प्रतिनिधी बिर्ला राम मंदिर येथे वासंती श्रीराम नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात पुणे येथील श्रुती सागर आश्रमाच्या परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांची प्रवचनमाला होणार आहे. हरिपाठ (संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विरचित) या विषयावर ही प्रवचनमाला होत आहे. 10 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान सायंकाळी सात ते साडेआठ दरम्यान ही प्रवचने होतील. नऊ एप्रिलपासून श्रीराम जन्मोत्सवाला सुरुवात होणार आहे. प्रभू श्रीराम यांना रोज सकाळी महाभिषेक पूजन, त्याचबरोबर सकाळी साडेनऊ ते साडेदहा दरम्यान नामस्मरण, रोज महिला भजनी मंडळाचे भजन साडेसहा वाजता सामूहिक रामरक्षा, पाऊणेसात वाजता सायम आरती असे कार्यक्रम आहेत. विशेष कार्यक्रमात 13 एप्रिलला सकाळी महिला पुरोहित वर्गाकडून पवमान सुक्ताने अभिषेक व सायंकाळी दीपोत्सव होईल. 14 एप्रिलला पुष्पोत्सव, त्याचबरोबर 17 एप्रिलला सकाळी रामनाम गुणगाण हा भक्ती संगीताचा कार्यक्रम विवेक केळकर व सहकारी सादर करणार आहेत. दुपारी बारा वाजता विशेष राम जन्माची आरती, सायंकाळी महाआरती व त्यानंतर सात ते दहा वाजेदरम्यान महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम पंचक्रोशीतील समस्त रामभक्त मिळून दरवर्षी आयोजित करतात. यात श्रीराम मंदिर सोसायटी व बिर्ला चॅरीटेबल ट्रस्ट यांचे व्यवस्थापक गुलशन ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभते. आशिष ठाकूर, जगदीश काबरा, अशोक तापडिया, नंदू गोखले, आनंद करवा, मुकुंद कुलकर्णी, सुरेश गुंजाळ, पियुष पटेल, करंदीकर, रेणुका मुळे, सचिन रोकडे, पंकज चंद्रात्रे तसेच इतर सर्व रामभक्तांचे देखील सहकार्य मिळते. —

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.