नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या आराध्या शर्मा या विद्यार्थिनीने रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राज्यस्तरीय रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
मुंबई येथे आयोजित या स्पर्धेत आराध्याने ५००० मीटर पॉइंट टू पॉइंट रिंक रेस या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आराध्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
—
सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या आराध्या शर्माचे राज्यस्तरीय रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक
Get real time updates directly on you device, subscribe now.