नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त समाजातील गरजू घटकांपर्यंत सणाचा आनंद आणि मायेची ऊब पोहोचवण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने ‘दिवाळी – गिफ्ट ऑफ हॅपीनेस’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक, मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात नवजात बालकांना झबले, टोप्या, लंगोट आणि उबदार गोधड्या तसेच मातांना पोषक आहार म्हणून राजगिरा लाडू यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक डॉ. प्राची बिरारी, प्रकल्प संयोजक डॉ. अमित धांडे, तसेच रुग्णालयातील सहकारी वैद्यकीय चमू व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक धोळकिया, सह सचिव नलिन राजपूत, डॉ. नामपूरकर, दिलीप चव्हाण, चारुलता धोळकिया आणि शिरीष भालेराव, डॉ. कृपा धांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बालकांना व मातांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
“सेवा हीच खरी दिवाळी” या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे रुग्णालय प्रशासनाकडून व नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
—