नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील प्रभाग क्र. १ मध्ये ‘एक–आनंद प्रभाग स्वच्छता अभियान’, तसेच ‘एक–आनंद मोफत जलसेवा’ या दोन लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी (दि. २०) शुभारंभ करण्यात आला. किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओंकारनगर सार्वजनिक वाचनालय येथून या अभियानाला सुरुवात झाली. शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख तथा मनपा गटनेते अजय बोरस्ते आणि उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते.
प्रभाग क्र. १ चे नगरसेवक तथा शहर सुधार समितीचे सदस्य प्रविण जाधव यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रभागातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना जेसीबी व ट्रॅक्टरची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोकळ्या जागांची साफसफाई, साचलेला मलबा व कचरा हटविणे तसेच परिसर स्वच्छतेसाठी या यंत्रसामग्रीचा उपयोग केला जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचणीच्या काळात ‘एक–आनंद मोफत जलसेवा’ अंतर्गत पाणी टँकरची सेवाही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अभियानाच्या पहिल्याच दिवशी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले. महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, मंडळांचे कार्यकर्ते तसेच विविध कॉलनी व नगरांतील पदाधिकारी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्परतेने काम करण्याच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यापुढे प्रभागातील विविध कॉलनी, नगर व परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने स्वच्छता अभियान राबवून नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे. ‘आपला परिसर – आपली जबाबदारी’ या भावनेतून प्रभाग क्र. १ स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

स्वच्छ प्रभाग घडविणे ही केवळ महापालिका किंवा लोकप्रतिनिधींची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरासाठी थोडा वेळ श्रमदान केल्यास प्रभागाच्या स्वच्छतेत मोठा बदल घडविता येईल. स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामग्री नागरिकांना उपलब्ध करून देतानाच लोकसहभागातून प्रभाग क्र. १ अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– नगरसेवक प्रविण जाधव
– नगरसेवक प्रविण जाधव