क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळावा उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
शरणपूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळावा उत्साहात झाला. आजी – माजी प्रशिक्षणार्थ्यांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात नाशिकच्या सातपूर एमआयडीसीमधील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी लिमिटेड आणि अंबड एमआयडीसीमधील तुषार इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपन्यांनी सहभाग घेतला. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे एचआर मॅनेजर अद्वैत साठे आणि तुषार इंडस्ट्रीजचे एचआर मॅनेजर विक्रांत जोशी व प्रोडक्शन मॅनेजर रोहन गुऱ्हाळे यांचे स्वागत आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी केले. मान्यवरांचा परिचय आयटीआयचे गटनिदेशक साहेबराव हेंबाडे यांनी करून दिला.
प्राचार्य काळे यांनी सांगितले, की आयटीआय प्रशिक्षणार्थी यांच्या रोजगार संधीसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन आयटीआयचे प्रशिक्षणार्थी जास्तीत जास्त रोजगार कसे मिळवतील, यासाठी विविध उपक्रम  आयटीआयमध्ये सतत होत असतात. याही रोजगार मेळाव्यातून आयटीआयचे प्रशिक्षणार्थी नक्कीच रोजगार मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साठे यांनी कंपनीविषयी प्रशिक्षणार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आलेल्या रोजगार संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी कंपनीच्या शिस्तीविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर जोशी साहेब यांनी कंपनीविषयी माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आयटीआयचे गटनिदेशक उमेश पालवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन निदेशक आनंद जाधव यांनी केले.                                               या मेळाव्यासाठी आयटीआयमधील आजी व माजी 96 प्रशिक्षणार्थ्यांनी हजेरी लावली व मुलाखत देऊन त्यापैकी 47 प्रशिक्षणार्थ्यांची अप्रेंटिसशिप आणि ट्रेनी म्हणून निवड करण्यात आली. तसे त्याबद्दलचे नियुक्तीपत्र प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आले.
आयटीआयचे निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, संदीप काजळे, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, अजय पवार, योगेश गांगोडे, सुशील लोहकरे, अमोल नागरे, तसेच निदेशिका सोनाली खिराडी आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.