नाशिक : प्रतिनिधी
येथील दिंडोरीरोडवरील सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने बालसुधारगृहातील मुला – मुलींना दोन्ही वेळचे भोजन मूल्य म्हणून दहा हजार रूपयांची मदत करण्यात आली. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड, संचालक व बालसुधारगृहाचे उपाध्यक्ष डी. आर. पाटील, पतसंस्थेच्या संचालिका व नगरसेविका दीपाली गीते, संचालक सुखदेव पाटील, अविनाश दरगोडे, अजय मुळाणे, जयमाला सुभाष काकड व त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष काकड यांच्या वाढदिवसानिमित्त ही मदत करण्यात आली.
स्वामी विवेकानंदनगर मित्रमंडळाच्यावतीने वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी प्रशांत जोशी, प्रकाश धात्रक, स्वानंद कुलकर्णी, तानाजी सूर्यवंशी, योगेश पाबळे कृष्णा दुसाने, सुनील शिंदे, दिलीप कुर्दळ, सचिन सुकेनकर, बापू कावळे, राजेंद्र वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—