नाशिक : प्रतिनिधी
भाजपचे पंचवटी मंडल आणि योग प्रकोष्ट टीमने शहरी व ग्रामीण भागात योग दिन साजरा केला. तसेच केंद्र सरकारच्या कामकाजाचे 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या महत्त्वपूर्ण कामांची माहिती विकास प्रदर्शनीतून देण्यात आली. नऊ ठिकाणी कार्यक्रम झाले. भाजपचे पंचवटी मंडलचे अध्यक्ष बबनराव ढगे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात योगदिन साजरा झाला. महापालिका शाळा क्रमांक एकमध्येही योग दिनानिमित्त कार्यक्रम झाला. योग का करावा? त्याचे फायदे योगप्रकोष्ठच्या टीमने समजावूनन सांगितले. बबनराव ढगे, रोहिणी दळवी, अंकिता शेट्टी, साधना मोरे, अपर्णा कुलकर्णी, रेखा पवार, संगीता मोरे, किशोर भंडारी आदी उपस्थित होते.
रासेगाव (ता. दिंडोरी) येथील मातोश्री नर्मदाबाई पोपटराव ढगे विदयालयात कार्यक्रम झाला. येथील शेतकरी वर्ग आणि कष्टकरी वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना आसने व प्राणायाम करून त्याची माहिती दिली. योग प्रकोष्टचे किशोर भंडारी यांचे योगदान लाभले. मुख्याध्यापक गोरक्ष ढगे यांनी नियोजन केले.
विकासाची प्रदर्शनी
तारवाला नगरमध्ये 12 वर्ष विकासाची प्रदर्शनी लावण्यात आली होती. नगरसेवक सागर लामखडे, मंडल अध्यक्ष बबनराव ढगे, अनिल दराडे, निवृत्त शिक्षक व्यवहारे, शहर उपाध्यक्षा रोहिणी दळवी, मंडलाचे युवा मोर्चा अध्यक्ष अमोल हिंगमिरे, ॲड. ऋषिकेश ढगे, सोनुभाऊ दळवी, योगशिक्षका प्रतिभा धस आणि योगाचार्य रमेश धस आदी उपस्थित होते. हास्य क्लबचे सदस्य उपस्थित होते. योग साधकांना सरकारी योजनांची माहिती मिळाली. अध्यक्ष ढगे यांनी मार्गदर्शन केले.
पंचवटी मंडल पदाधिकारी चंद्रभान अहिरे, तुषार देशमुख, मनपा अभियंता सुशील शिंदे यांनी शहरात केंद्र सरकार राबवत असलेल्या अमृत योजनेची माहिती देऊन पाणी पुरवठा कसा आणि मोठ्या प्रमाणाने सुरळीत होईल, या संदर्भात माहिती दिली. रोहिणी दळवी यांनी राज्य व केंद्र सरकार यांच्या योजनांची माहिती दिली. अनिता सोनवणे यांनी सरकारच्या चांगल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहचल्या यासंदर्भात माहिती दिली. व्यवहारे यांनी, पंतप्रधानांनी आपल्या देशाची मान कशी जगात उंच केली आणि आपली मिसाईल टेक्नॉलॉजी जगाला आपण देतो ही माहिती दिली.
—