नाशिक जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धा उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा फेंसिंग असोसिएशन व डी. एस. एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षक नेते रवींद्र मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिका मंदिर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय तलवारबाजी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक दुधारे, ओझरचे नगरसेवक अशोक कदम, कालिका संस्थेचे सरचिटणीस डाॅ. प्रतापराव कोठावळे, संचालक सुरेंद्र कोठावळे, जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, सुरेश सादडे उपस्थित होते.
भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा झाली. छत्रपती पुरस्कारप्राप्त जय शर्मा, मनोज मस्के, प्रसाद परदेशी यांनी स्वागत केले. अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले. दीपक निकम यांनी आभार मानले. छत्रपती पुरस्कारप्राप्त व स्पर्धा संयोजक राजू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा निकाल असा –
१४ वर्षातील फॉईल मुले : प्रथम – प्रणव डेर्ले, द्वितीय – सत्यजित खैरणार, तृतीय –  रियांश मस्के व सुरज पाटील. फॉइल मुली :  प्रथम – लब्दी मोदी, द्वितीय – आराध्या उमले, तृतीय – अनन्या सुळे व मोक्षिता केसकर.
इपी मुली : प्रथम – तीर्थांवी महाजन, द्वितीय – गौरी हेकरे तृतीय – अदिती पाटील व रेवा पाटील. इपी मुले : प्रथम – गुरुदीप पाटील, द्वितीय – अर्णव धनगर, तृतीय – विराज गोसावी व विराट पाटील. सेबर मुली : प्रथम – शरण्या डेर्ले, द्वितीय – अनविता ताजने, तृतीय – मोहीम शेख व अशाना शितोळे. सेबर मुले :  प्रथम – भावेश पाटील, द्वितीय – आदित्य पाटील, तृतीय – अर्णव सोलंकी व यशराज निकम.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.