म. फुले जयंतीनिमित्त भाजपच्या नाशिक रोड मंडलतर्फे अभिवादन कार्यक्रम

0

नाशिक : प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त भाजपतर्फे नाशिक रोड मंडल येथे अभिवादन कार्यक्रम झाला. नाशिक रोड मंडलाचे अध्यक्ष शांताराम घंटे, प्रदेश महामंत्री दिनेश पगारे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र मोरे, नगरसेवक सतीश निकम, जयंत जाचक, भंडारी, राहुल दिवे, तसेच मंडलातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नाशिक महानगर प्रमुख सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडल उपाध्यक्ष तथा जयंती अध्यक्ष रामदास गांगुर्डे, सुनील आडके, निवृत्ती भोर, विजय लोखंडे, सरचिटणीस बापू सापुते, कैलास आढाव, जयद्रथ काकडे, विजय थोरात, निर्मल भंडारी, अरुण माळवे, राजू बोराडे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.