नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लायन्स क्लब सुप्रीमच्यावतीने पेठ, हरसूल भागात वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबीर झाले. यात नेत्रतपासणी करण्यात आली. काही नागरिकांच्या मोतीबिंदू व काचबिंदूंचे ऑपरेशन झाले. राजेंद्र पगार यांच्यावतीने त्यांना चष्मे वाटप व काही पाड्यांवर महिलांना १०० साड्यांचा वाटप कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचे सांगितले.
त्यासाठी दिलीपसिंग पाटील, सुरेश भामरे, किरण सोनवणे यांचा हातभार लागणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर रोडवरील शेवगेदांग या पाड्यावर लायनचे अध्यक्ष एन. एस. पाटील यांच्यावतीने दोन टॉयलेट बांधून देण्यात येणार आहेत. लवकरच सदर कार्यक्रम पार पडतील, असे संस्थापक अध्यक्ष जे. पी. जाधव व माजी अध्यक्ष जिभाऊ सोनवणे यांनी सांगितले. पी. एस. पाटील, एन. डी. पवार, निर्मळ, धात्रक, हिरामण सोनवणे, राजेंद्र खैरनार, सावकार आदी उपस्थित होते.
—