नाशिक : प्रतिनिधी
अजितदादा पवार हे जनतेचे प्रश्न सोडविणारे, वेळ व शब्दाला जपणारे, तसेच प्रशासनावर घट्ट पकड असणारे लोकनेते होते, अशी भावना मान्यवरांनी विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आदरांजलीसाठी शोकसभा हुतात्मा स्मारक येथे झाली. याप्रसंगी या भावना व्यक्त करण्यात आल्या.
कसमादे मराठा उत्कर्ष संस्थेचे उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा छायाचित्रकार संघटनेचे हिरामण सोनवणे म्हणाले की, अजितदादा हे लोकहिताच्या कार्यक्रमासाठी प्रसंगी कटूता घेणारे, रोखठोक बोलणारे, अवतीभोवती कार्यकर्त्यांचा मोहोळ असणारे नेते होते. ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे ध्यास असणारे, मनाने हळवे, अजातशत्रू व कार्यकर्त्यांची निर्मिती करणारी खाण होती.
कार्यक्रमास, यशवंतराव पाटील, पद्माकर पाटील, नगरसेवक सुरेश पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, करण गायकर, हरीश आडके, जयेश बर्वे, राजू देसले, सोमनाथ मुठाळ, जिभाऊ सोनवणे, मिनाज मिर्झा, अजमल खान, भरत जैन, सुरेश बागूल, वाघोलीकर, नितीन घोडके आदी उपस्थित होते. रमेश कडलक यांनी सूत्रसंचालन केले.
—
अजितदादांना संस्थांसह संघटनांची आदरांजली
Get real time updates directly on you device, subscribe now.