“कारस्थान करणाऱ्यांना चपराक; म्हसरूळच्या ‘रिअल हिरो’ वंदना पेलमहाले यांचा विजयाचा निर्धार!”

0

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ व परिसर) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार वंदना गणेश पेलमहाले यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जनसागराचे लक्ष वेधून घेतले. “निर्धार पक्का, घड्याळच नक्की” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या प्रचारादरम्यान एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. एका इमारतीला लागलेल्या मध्यरात्रीच्या आगीतून पेलमहाले दाम्पत्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले होते. या उपकाराची जाणीव ठेवत गृहिणींनी वंदना पेलमहाले यांचे औक्षण करून “तुम्ही आमचे रिअल हिरो आहात” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. मतदारांच्या मते, पेलमहाले यांचा ‘माणुसकीचा प्रचार’ हा कोणत्याही राजकीय जाहिरातीपेक्षा मोठा ठरला आहे.

वंदना पेलमहाले यांनी कोरोना काळात दिलेली ऑक्सिजन सेवा, डेंग्यू निर्मूलनासाठी केलेली औषध फवारणी आणि प्रभागातील सुरक्षिततेसाठी बसवलेले सीसीटीव्ही जाळे यामुळे त्यांची जनमानसात ‘लोकसेवेचा पेलमहाले पॅटर्न’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना वंदना पेलमहाले ठामपणे म्हणाल्या, “माघार हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. कितीही कट-कारस्थाने झाली तरी आम्ही जनसेवेसाठी लढत राहू.” येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी ‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करून विकासाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, म्हसरूळमध्ये घड्याळाचा गजर निश्चित मानला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.