म्हसरूळ (प्रभाग एक) मध्ये बुलेटची धडधड आणि कार्यकर्त्यांचा उत्साह; डॉ. शिंदेंनी दाखवले ‘नाशिक’ कोणाचे?

0

नाशिक  : प्रतिनिधी
पंचवटीतील म्हसरूळ व परिसरात प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची बाईक रॅली बुधवारी (दि. ७ जानेवारी) काढण्यात आली. नाशिकमध्ये शिवसेनेत वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. शिवसेनेचा महापौर होईल, असा विश्वास खासदार डाॅ. शिंदे यांनी व्यक्त केला.

उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांच्या प्रचारार्थ ही रॅली होती. राजमाता माता मंगल कार्यालय येथून रॅलीस शुभारंभ करण्यात आला. शुभम पार्क, कलानगर, पाटील लेन, म्हसरूळ, किशोर सूर्यवंशी मार्ग आदी परिसरातून कणसारा माता चौकमार्गे राऊ हॉटेल येथे या रॅलीचा समारोप झाला.
यावेळी मंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे, तसेच प्रभाग क्रमांक शिवसेनेचे(शिंदे गटाचे) अधिकृत उमेदवार प्रवीण रमेश जाधव, नयना रवींद्र रामवंशी, गणेश चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरगुडे यांच्यासह महिला, नागरिक उपस्थित होते.

नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार रॅली पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथून सुरू झाली. या रॅलीपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत भाऊ चौधरी, हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. याआधी देखील ३५ नगरसेवक निवडणून आले होते. आता आमच्या सोबत राष्ट्रवादी आहे. आता आणखीनच यश मिळेल. आम्ही आकड्यांच्या गणितात जात नाही. शिवसेनेचा महापौर होईल. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत पहायला मिळाले.

खासदार डाॅ. शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जास्त काम झाले आहे. जास्त निधी महाराष्ट्राला मिळाला. नवीन योजना आणण्याचे काम झाले. नाशिकला निधी आणण्याचे काम केले. कुंभमेळा येतोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तयारी करत आहे. नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकास होईल. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. आताही स्ट्राईक रेट राहील, ६४ ठिकाणी नगराध्यक्ष बनले आहे.

बंडखोरांविषयी शिंदे म्हणाले की, बंडखोरीचा मला प्रॉब्लेम वाटत नाही. नगरपालिकेला होते. स्ट्राईक रेटला १३५ पैकी ६४ जागी नगराध्यक्ष राहिले.
तपोवनाबाबत ते म्हणाले की, तपोवन वाचविणे आहे. शिवसेना नाशिकबरोबर आहे. आमचा पाठिंबा आहे. पर्यायी मार्ग काढला पाहिजे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.