प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक : प्रतिनिधी

म्हसरूळ येथील दिंडोरीरोडवरील अभिषेक प्लाझा हॉलमध्ये आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला प्रभागातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एकूण १६५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सामाजिक सेवा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक १ मध्ये डॉ. सचिन देवरे आणि डॉ प्रतिक्षा सचिन देवरे (पिंगळे) यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

विविध आजारांची तपासणी

या शिबिरात मोफत नेत्ररोग, दंतरोग, हृदयरोग, मधुमेह, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, पोटाचे छातीचे विकार, हाडांचे व मणके विकार, मूळव्याध भगंदर विकार आदी अनेक आजारांची तपासणी करून उपचार करण्यात आले. या शिबिरात शहरातील नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते.
११०० नागरिकांनी स्वतःची रक्तशर्करा तपासली

या शिबिरासाठी साई समर्थ हॉस्पिटल, बिर्ला आय हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. शिबिरात विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता. यात प्रामुख्याने ११०० नागरिकांनी स्वतःची रक्तशर्करा तपासून घेतली. नागरिकांनी आरोग्य तपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला घेतला. सामाजिक बांधिलकीतून आरोग्य जनजागृतीसाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली.

यशस्वीतेसाठी एकजुटीने मदत
प्रभाग क्रमांक १ मधील सर्व वैद्यकीय बांधव डॉक्टर्स, पथॉलॉजिस्ट, फार्मासिस्ट आणि आरोग्यसेवक यांनी डॉ. सचिन देवरे यांनी आयोजित केलेल्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकजुटीने मदत केली. समाजात सकारात्मक बदल शक्य आहे आणि तो घडवण्याची ताकद डॉ सचिन देवरे ह्यांच्या टीममध्ये आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले.

यापुढे प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांची मोफत तपासणी
डॉ. सचिन देवरे हे नागरिकांच्या प्रत्येक लहान–मोठ्या आरोग्य समस्येला तत्परतेने साथ देणारे, खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सोबत डॉ. प्रतीक्षा सचिन देवरे हे देखील सर्व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन त्यांना मदत करत असतात.
समाजसेवेला प्राधान्य देणारे देवरे कुटुंब आज मोठा निर्धार व्यक्त करते. यापुढे ते प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांची मोफत तपासणी करणार आहेत. म्हणजेच प्रभाग क्र. १ मधील राहणाऱ्या कोणत्याच रुग्णाकडून ते शुल्क स्वीकारणार नाहीत, असे त्यांनी आज सर्वांसमोर जाहीर केले. त्याचप्रमाणे यापुढे प्रभाग क्र. १ मधील कोणत्याही नागरिकाला मोफत नेत्र तपासणी करावयाची असेल तर त्यांनी डॉ सचिन देवरे सर यांना संपर्क साधावा.

देवरे कुटूंबाला साथ द्यावी
या उदार कार्याचा लाभ समाजाला सतत मिळत राहावा यासाठी आपण सर्वांनी डॉ. सचिन देवरे आणि त्यांच्या कुटुंबाला प्रभागातील सर्व नागरिकांनी साथ द्यावी, ही सर्वांना कळकळीची विनंती. म्हणूनच सर्व नागरिकांना आवाहन आहे की, तरुण, सुशिक्षित, प्रामाणिक आणि कार्यक्षम उमेदवाराला साथ द्या आणि समाजात योग्य बदल घडवा, असे आवाहन डाॅ. देवरे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.