अर्ध्या तासात, फ्रेश केक तयार, तोही ग्राहकासमोरच बनविलेला अन् कमी किमतीत, ही थीम असलेल्या म्हसरूळमधील निहीत बेकर्सची सर्वत्र चर्चा

0

 म्हसरूळ : प्रतिनिधी
अवघ्या अर्ध्या तासात, फ्रेश केक, तोही ग्राहकासमोरच बनविणार अन् कमी किमतीत, ही थीम घेऊन आलेली `निहीत बेकर्सʼ ही बेकरी सध्या म्हसरूळसह नाशिक परिसरात चर्चेची विषय बनली आहे. ग्राहकही आवर्जुन येथे भेट देऊन विविध पदार्थ चवीने खात आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक पदार्थ लाकडी भट्टीवर बनविले जातात. ही बेकरी रविवारी (दि.13 मार्च, 2022) आपला वर्धापनदिन ग्राहकांच्या प्रतिसादात साजरा करत आहे.
म्हसरूळ येथील मखमलाबाद लिंक रोडवरील कणसारा माता चौकातून बोरगड रोडवर पुष्पकनगर येथे ही निहीत बेकर्स आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर हर्षल इंगळे-पाटील यांनी या बेकरीची मुहूर्तमेढ गेल्याच वर्षी रोवली. त्यासाठी त्यांनी वडील मधुकर रेवजी इंगळे-पाटील मदत करत आहेत.

येथील केक व डोनेट वैशिष्ट्यपूर्ण आहे. केकमध्ये रसमलई, काजू मलई, बदाम मलई, पिस्ता मलई, चीज रेड वेलवेट, बटर स्काॅच, पायनापल, स्ट्राॅबेरी, रोझ, फालुदा, बटर स्काॅच या प्रकारांना खवय्यांनी पसंती दिली आहे.

`निहीत बेकर्सʼमधील पिनाटा केक तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यात चाॅकलेटचा बाॅल असतो. यात चक्क केक ठेवलेला असतो. महत्त्वपूर्ण म्हणजे या बाॅलमध्ये केकसोबत आपण फोटोसह इतर भेटवस्तू ठेऊ शकतो.

केकसोबतच चाॅकलेट डोनेटलाही ग्राहकांकडून मागणी आहे. ड्राय फ्रूट चाॅकलेट हेही चव चाखून पहावे असे आहे. खारी, टोस्ट, नानकटाई, रोट, गहू व नागलीचे बिस्कीटही त्यांनी उत्कृष्ट दर्जा राखून उपलब्ध करून दिली आहे. येथील व्हेज पॅटीस नाश्ता म्हणून लोक येथेही खातात व घरीही नेतात.

हर्षल इंगळे-पाटील, युवा उद्योजक

बेकरीसाठी हाॅटेल मॅनेजमेंट काॅलेजचे प्राचार्यपद भूषविलेल्या गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गाडेकर यांनी दुबईत चक्क दोन किलोमीटर लांबीचा केक बनविला होता. तो विक्रमच झाला आहे.


निहीत बेकर्सचा रसमलई व चीज रेड वेलवेट हे केक आम्हाला आवडतात. मी बेकरीपासून काही किलोमीटरवर राहतो, तरी `निहीतʼचा केक आम्ही मागवतोच.
– डाॅ. जयेश सोनजे साहेब, पंचवटी

निहीत बेकर्सचे क्रीमरोल व टोस्ट आमच्या पसंतीस उतरलेले आहे. साहजिकच ही खरेदी होतेच.
– श्री. गंगवाल साहेब, पोलिस निरीक्षक – सरकारवाडा पोलिस स्टेशन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.