डॉ. उज्जैनकर फाउंडेशनचे शिव रत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्राचार्य डॉ. शहाणे, डॉ. जाधव, डॉ. देशमुख, इटणारे, जोशी, राजोळे यांचा नवी दिल्ली येथे होणार सन्मान

0

नाशिक : प्रतिनिधी
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन (मुक्ताईनगर, जळगाव) यांचे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन त्र्यंबकेश्वर येथे नुकतेच उत्साहात झाले. याप्रसंगी शिव रत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात फाउंडेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. रमाकांत जाधव (नाशिक), उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुख डॉ. प्रतापराव देशमुख (नाशिक), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विजय इटणारे (त्र्यंबकेश्वर), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सारिका मंगेश जोशी (नाशिक), नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संजय राजोळे यांना समावेश आहे.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण  उज्जैनकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार नवी दिल्ली येथे होणाऱ्या पुढील संमेलनामध्ये देण्यात येतील. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.