हृदयात रुतलेल्या अनुभूतीतून व्यक्त होते ती कविता : सुहास टिपरे

शब्दांजली साहित्य महोत्सव उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
एखादा अनुभव, अनुभूती हृदयात खोलवर रुतते आणि मग त्यातून आपण व्यक्त होतो. हे व्यक्त होणे महत्वाचे असते. मग त्यासाठी शब्द, भाव – भावना, व्याकरण आदी गोष्टी साहाय्यभूत ठरतात. मनापासून सुचलेले असते, ते काव्य असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांनी केले.
साहित्य रंग साहित्य मंच आयोजित शब्दांजली या साहित्य महोत्सवामध्ये प्रमुख अतिथी म्हणून टिपरे बोलत होते. याप्रसंगी आयोजक डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. प्रदीपकुमार कळस्कर, विनोद बैरागी आदी उपस्थित होते.

खुशाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य स्पर्धांचे परीक्षण डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

या साहित्य महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल असा :
लेख चषक स्पर्धा : प्रथम –  वैशाली सूर्यवंशी, द्वितीय – सुनील शिरसाठ, तृतीय – कुशल दुसाने. काव्य चषक स्पर्धा : प्रथम – योगेश पानपाटील, द्वितीय – प्रीती सोनवणे, तृतीय – सुनील शिरसाठ.  स्वर्गीय विमल हरिश्चंद्र टिपरे स्मरणार्थ खुली स्पर्धा : प्रथम – प्रीती सोनवणे, द्वितीय – अश्विनी पुरी, तृतीय – संतोष जाधव. उत्तेजनार्थ : सोनाली चव्हाण, उन्नती नाकील, श्रावणी खातंळे, सम्राज्ञी सूर्यवंशी, सुवर्णा कळस्कर व रवींद्र दुसाने. प्रश्न मंजुषा स्पर्धा :  प्रथम – कांचन दांडेकर, द्वितीय – संतोष जाधव, तृतीय – अनिता रोकडे. याचे परीक्षण सुनील शिरसाठ यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात दिवसाची विशेष व्यक्ती हा सन्मान संतोष तावडे यांनी मिळवला. साहित्य महोत्सवासाठी अहिल्यानगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, इगतपुरी, मुंबई, पुणे येथून साहित्य रसिक आले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.