नाशिक : प्रतिनिधी
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे (मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) चौथे अखिल भारतीय शिवा मराठी साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी व आदिशक्ती संत मुक्ताई व्यासपीठ श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर, जि. नाशिक येथे तीन व चार ऑक्टोबर २०२६ ला आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाच्या नाशिक येथील पदाधिकाऱ्यांची सभा आणि पत्रकार परिषद नुकतीच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह शिवनेरी, गडकरी चौक, नाशिक येथे नुकतीच झाली. याप्रसंगी संमेलनाच्या लोगोचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तसेच संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी उपस्थित मान्यवरांना आदिशक्ती संत मुक्ताईचा फोटो व संमेलनाची पत्रिका प्रदान केली. त्यांनी पत्रिकेचे वाचन करून दोन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रांविषयी माहिती दिली. सर्व पदाधिकाऱ्यांना आदिशक्ती संत मुक्ताईचा फोटो व संमेलनाची पत्रिका सन्मानाने प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी या संमेलनाचे निमंत्रक जे. एस. डब्ल्यू. जे. एफ. ई. इलेक्ट्रिकल स्टील, नाशिकचे युनियन अध्यक्ष विलास पाटील, फाउंडेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष येथील प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. रमाकांत जाधव, फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुख डॉ. प्रतापराव देशमुख, संजय राजोळे, फाउंडेशनच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सारिका जोशी, फाउंडेशनचे नाशिक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख डॉ. श्यामकुमार दुसाने. तसेच लक्ष न्यूज चॅनलचे रणजीत साळी, प्रसिद्ध रिल कलाकार नाशिक येथील विजय खरोटे आदी पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी काही मान्यवरांना तापी पूर्णा राष्ट्रीय पुरस्काराचे पत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी याप्रसंगी प्रदान केले. त्यामध्ये संजय राजोळे यांना तापी पूर्णा राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार, तर विजय खरोटे यांना तापी पूर्णा राष्ट्रीय उत्कृष्ट कला पुरस्काराचे याप्रसंगी पत्र सुद्धा प्रदान करण्यात आले.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी, तसेच या संमेलनाचा राष्ट्रीय रेकॉर्ड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे उपस्थित फाउंडेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, तसेच नाशिक जिल्हा पदाधिकारी व फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
—