नाशिक : प्रतिनिधी
गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टिपरे यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. सयाजीराव गायकवाड स्वायत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लबच्या अध्यक्ष शर्मिला मेहता, कवियत्री जयश्री वाघ, प्रा. सुनील हिंगणे, महाराष्ट्र गिरीजा महिला मंचच्या उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर आदी उपस्थित होते.
—