रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनचा देशी वृक्षारोपण व शैक्षणिक उपक्रम

0

नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक मिडटाउनतर्फे अर्थ फाउंडेशन, नाशिक यांच्या सौजन्याने नाळेगाव, ता. दिंडोरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत देशी झाडांचे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते पेरू, आंबा, जांभूळ आदी फळझाडांसह करंजी, वड,  बेल अशी एकूण १०० भारतीय देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. भविष्यात ही झाडे मोठी होऊन विद्यार्थ्यांना सावली, शुद्ध हवा तसेच पौष्टिक फळे देतील, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक झाडाची जबाबदारी स्वीकारून त्याला नियमित पाणी देणे, संगोपन करणे व ते मोठे करण्याचा संकल्प केला. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी व निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘राजआकांक्षा’ शैक्षणिक ॲपचे वितरण करण्यात आले. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे अभ्यास करता यावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.

कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव राजेंद्र वर्मा, डी. आर. पाटील, अवतारसिंग, गरेवाल, विनोद तन्ना व रमा वर्मा यांची उपस्थिती होती. प्रकल्पाच्या सहसंयोजक प्रतिभा चौधरी यांनी संपूर्ण प्रकल्पात जातीने लक्ष घालून नियोजन व आवश्यक समन्वय साधत हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना राजआकांक्षा या स्टडीऍपचे वाटप करण्यात आले
“आज लावलेले देशी वृक्ष म्हणजे उद्याच्या पिढीसाठी सावली, शुद्ध हवा आणि समृद्ध निसर्गाची अमूल्य भेट” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.