रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडाउनतर्फे तीन शाळांमधील २५० विद्यार्थ्यांना राजआकांक्षा ॲपचे मोफत वाटप

0

नाशिक : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि डिजिटल शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडाउनच्यावतीने शहर व परिसरातील तीन शाळांमध्ये एकूण २५० विद्यार्थ्यांना ‘राजआकांक्षा’ शैक्षणिक ॲपचे मोफत वाटप करण्यात आले.
रोटरीच्या या विशेष उपक्रमाअंतर्गत मातोश्री राधाबाई शांतारामबापू वावरे हायस्कूल, आनंदवल्ली येथील ५० विद्यार्थ्यांना रो. काशिनाथ देसाई यांच्या सौजन्याने ३० जुलै रोजी ॲपचे वाटप करण्यात आले. तसेच ७ ऑगस्ट रोजी उन्नती विद्यालय, पेठ रोड येथील १०० विद्यार्थ्यांना अध्यक्ष रो. दिपक धोळकिया यांच्या सौजन्याने ॲपचे वितरण करण्यात आले व स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथील १०० विद्यार्थ्यांना  रो. जे. जे. पवार यांच्या सौजन्याने ॲपचे वाटप करण्यात आले.

ॲप वितरणप्रसंगी रो. मनोज काबरा, अध्यक्ष रो. दिपक धोळकिया आणि  रो. जे. जे. पवार यांनी विद्यार्थ्यांना ॲपचा वापर कसा करावा, त्यातील अभ्यासाची माहिती, आणि स्व-अध्यायानाची सवय लावून परीक्षेत उत्तम गुण कसे मिळवावेत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
​       गतवर्षी या ॲपच्या वापरामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा अनुभव शाळा प्रशासनाने व्यक्त केला व रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
​       या सर्व कार्यक्रमांना रोटरीचे अध्यक्ष रो. दिपक धोळकिया,  रो. जे. जे. पवार, रो. मनोज काबरा, रो. डॉ. गडकरी, रो. काशिनाथ देसाई, रो. डी. आर. पाटील, रो. अवतारसिंग पनफेर, रो. सुभाष पगारे आणि सह-सचिव रो. नलिन राजपूत आदी मान्यवर, शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व दहावी इयतेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.