नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये मेटा फोर्ज इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड (म्हसरूळ, नाशिक) या कंपनीच्या मुख्य उपस्थितीमध्ये रोजगार मेळावा उत्साहामध्ये झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेचे संचालक शरद बोडके होते. मेटा फोर्ज इंजीनियरिंग प्रा. लि.चे संचालक कौस्तुभ मेहता, तसेच कंपनीचे क्वालिटी हेड मॅनेजर आदर्श आहेर, प्रोडक्शन हेड मॅनेजर गणेश ढिकले, फायनान्स हेड विवेक जैन उपस्थित होते.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक आणि सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. आयटीआयचे गटनिदेशक उमेश पालवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्राचार्य नितीन काळे यांनी रोजगार मेळाव्याविषयी माहिती दिली. संचालक बोडके साहेब यांनी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराचे महत्त्व पटवून दिले आणि यानिमित्ताने आलेल्या संधीचा फायदा प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले. यानंतर आदर्श आहेर यांनी या कंपनीविषयी माहिती दिली.
निदेशक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गटनिदेशक साहेबराव हेंबाडे यांनी आभार मानले.
या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार मिळविण्यासाठी अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेऊन लगेचच त्यांनाकंपनीचे रुजू पत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, अजय पवार, योगेश गांगोडे, संदीप काजळे, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी, भारती नागरे, अमोल नागरे, राहुल सानप आदी कर्मचारी उपस्थित होते.
—
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळावा उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.