जनसेवेच्या ‘धनुष्यबाणा’चा प्रभागात एल्गार; प्रविण जाधव यांच्या रूपाने परिवर्तनाची साद!

0

नाशिक : प्रतिनिधी
पद असताना काम सर्वच करतात, पण पद नसतानाही जो जनतेच्या अडीअडचणीला धावून येतो, तोच खरा लोकनेता!” याच भावनेतून प्रभाग १ मधील मतदारांनी प्रविणभाऊ जाधव व त्यांच्या पॅनेलला विजयी करण्याचा ठाम निश्चय केला आहे. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ व परिसरातील विविध भागांत झालेल्या गाठीभेटींदरम्यान महिला आणि तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. २०१७ पासून बदलाची वाट पाहणाऱ्या पंचवटीतील या प्रभागात यंदा प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू होणार, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उमेदवार प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सोमवारी वृंदावननगर, स्नेहनगर आणि परिसरात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या.

• जनभावना:  लोकप्रतिनिधी नसतानाही जाधव यांनी केलेली सामाजिक कामे आणि कोविड काळातील मदतीमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे.

 • संकट काळातील मदतीची पोचपावती
प्रविण जाधव यांनी सोमवारी वृंदावननगर, स्नेहनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि गुलमोहर नगर भागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर ज्येष्ठांनी विजयासाठी आशीर्वाद दिले. नागरिकांशी संवाद साधताना एकच सूर उमटत होता – “प्रविणभाऊंनी लोकप्रतिनिधी नसतानाही प्रभागासाठी जे काम केले, ते वाखाणण्याजोगे आहे.” विशेषतः कोविडसारख्या जागतिक संकटात जेव्हा सर्वजण घरात होते, तेव्हा प्रविण जाधव यांनी जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या हाकेला धावून जाणे आणि सामाजिक सेवेचा जो ठसा उमटवला, त्याची पोचपावती देण्याची वेळ आता आली आहे, अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या.

                   विकासाचा नवा अध्याय
प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसह युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रविण जाधव यांचे पॅनेल कटिबद्ध आहे. यावेळी पद्माकर मोराडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागात सध्या सर्वत्र परिवर्तनाची चर्चा असून, प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पॅनेल प्रभाग १ मध्ये विजयाचा नवा इतिहास रचणार, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.